निपाणीत हजारोंच्या उपस्थित नवकार महामंत्राचा जागर

निपाणी (प्रतिनिधी):-
निपाणी येथे बुधवारी जैन समाजाच्यावतीने सर्वत्र नवकार महामंत्राचे आयोजन करण्यात आले होते. वैश्विक शांतता, मानवजातीचे कल्याण, परस्परांतील स्नेहभाव वाढवणे आणि आध्यात्मिक उन्नती साधणे या उद्देशाने हा महामंत्र जप कार्यक्रम सर्वत्र पार पडला. त्यानुसार निपाणीतही व्यंकटेश्वर मंदिरात नवकार महामंत्राचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. जैन समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध जातीधर्मातील मान्यवर, नागरिक व महिलांनी सहभाग नोंदवला.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अरविंद शाह गुरुजी यांनी नवकार महामंत्राचा अर्थ सांगून या मंत्राचे महत्त्व विशद केले. संगीतकार प्रीतम ओसवाल व रॉकी ओसवाल यांच्या सुमधुर वाणीने नमोकार महामंत्रास सुरुवात झाली. सकाळी 7 ते 9.30 वाजेपर्यंत विविध चालीमध्ये या महामंत्राचा जागर करण्यात आला. यावेळी नटराज अकॅडमीच्यावतीने बालकलाकारांनी भरतनाट्यम सादर केले. त्याला टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली.
यावेळी आमदार शशिकला जोल्ले, नगराध्यक्षा सोनल कोठडीया, माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, प्रकाश शहा, साहिल शहा, बी. बी. बेडकिहाळे, रवी श्रीखंडे, युवराज पोळ,सचिन शहा, प्रतिक शहा, सागर मेहता, प्रसन्न दोशी, रुपेश शहा, सौरभ शहा, अरुण खोडबोळे, अक्षय उपाध्ये, अमर उत्तुरे, प्रणय शहा, नवीन शहा, साहिल श्रीपन्नावर यांच्यासह मान्यवर, श्रावक, श्राविका उपस्थित होत्या.