कोल्हापूर शहरात अवकाळी पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत .

0
अवकाळी पाऊस भात पिक व पिंजराचे नुकसान

  कोल्हापूर. (प्रतिनिधी)   गेल्या दोन दिवसात कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार अवकाळी पाऊस झाला. दिवाळीनंतर अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आणि नागरिकांना गारठ्याचा अनुभव आला.

       सध्या हवामानाची स्थिती संमिश्र दिसत आहे. ऑक्टोबर हिटमुळे उष्मा वाढलेला असताना अचानक ढगांचा गडगडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला तुरळक स्परूपात पडणारा पाऊस नंतर मुसळधार पडला.  पावसामुळे परिसर जलमय होऊन वातावरणात गारठा निर्माण झाला आणि हिवाळ्याची चाहूल लागली.

     अवकाळी पावसामुळे शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांत काढणीचा हंगाम जोरात चालू झाला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस धोकादायक ठरत असून, साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावरही  परिणाम होण्याची शक्यता आहे.

    अवकाळी पावसामुळे नागरिकांवरही परिणाम झाला. पावसामुळे भाविक आणि पर्यटकांची तारांबळ उडाली आहे. शहरातील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला. हवामानातील अशा अचानक बदलांमुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी काढणी झालेल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *