सांगरुळ येथे रक्त दान शिबीर व पेन्शन लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आमदार चंद्रदीप नरके यांच्याहस्ते वाटप
सांगरुळ. (प्रतिनिधी): महायुती सरकारने देशात आणि राज्यात विविध प्रकारच्या जनकल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत . लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी या योजना जनतेच्या घरापर्यंत पोहोचवल्यास याचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब गरजू जनतेला मिळतो .सुशांत नाळे व शाहू तालीम मंडळाने शासनाच्या या योजना घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे .त्यांच्या या सामाजिक कार्याला नेहमी पाठबळ देणार अशी ग्वाही करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली .
येथील छत्रपती शाहू (नाळे) तालीम मंडळ व पै सुशांत नाळे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर व पेन्शन लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके यांनी महायुती सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नसून त्याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कसा लाभ होईल यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले . चालू वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कार्यक्रम आयोजित करा असे मी कार्यकर्त्यांना सांगितले होते .सुशांत नाळे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करून कौतुकास्पद काम केले आहे असे गौरव उदगार आमदार नरके आणि यावेळी काढले .
गोकुळचे संचालक अजित नरके यांनी निराधारांना आधार असलेले श्रावण बाळ पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप व रक्तदान शिबिर आयोजित करून शाहू नाळे तालीम मंडळ व सुशांत नाळे यांनी आमदार नरके यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला आहे असे सांगितले
सुरुवातीस संयोजक पै.सुशांत नाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले .यानंतर पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप आमदार नरके यांच्या हस्ते करण्यात आले . कुंभ नदी धरण संस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल तानाजी वातकर यांचा आमदार नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी कुंभी’चे उपाध्यक्ष राहुल खाडे, माजी उपाध्यक्ष निवास वातकर रवींद्र मडके सदाशिव खाडे प्रदीप नाळे जनार्दन खाडे राजाराम खाडे प्रा एस पी चौगले संजय पाटील विलास पाटील बी बी पाटील यांचे सह कुंभी कासारी साखर कारखाना व कुंभी बँकेचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते .


