महालक्ष्मी करिअर अकॅडमीच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न
कोल्हापूर विभागाचे वनसंरक्षक धैर्यशील पाटील, शाहुवाडी पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांचे मार्गदर्शन लाभले
बांबवडे, ता.30 (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यातील गोगवे येथील महालक्ष्मी करिअर अकॅडमी मार्फत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मान्यवरांची मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सामोरे जाता यावे यासाठी गोगवे येथील महालक्ष्मी करिअर अकॅडमी ने येथील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विलासराव शामराव तळप हे होते तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर विभागाचे वनसंरक्षक धैर्यशील पाटील, शाहुवाडी पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांचे मार्गदर्शन लाभले
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक दीपक लाड, महालक्ष्मी प्रसारक मंडळाचे संचालक विष्णू पाटील, गिरीश पाटील, शंकर पाटील, तुकाराम पाटील यांच्यासह गावातील मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार राजेंद्र सूर्यवंशी यांनी मानले.


