कै. प्रा. रमेश दळवी(सर) फौंडेशन कडून विसावा वृध्दाश्रमला जीवनावश्यक साहित्य वाटप

0
कै. प्रा. रमेश दळवी(सर

कै. प्रा. रमेश दळवी(सर) फौंडेशन कडुन विसावा वृध्दाश्रमला जीवनावश्यक साहित्य वाटप 

कुर.ता.04 (प्रतिनिधी) गारगोटी (ता-भुदरगड)येथील डाॅ.संजीवकुमार भाटे व डाॅ.वैष्णवी भाटे यांच्या माध्यमातून चालु असलेल्या विसावा वृध्दाश्रमास कै.प्रा रमेश दळवी(सर)बहुउद्देशीय सामाजिक संस्था बसरेवाडी यांचेमार्फत संस्थापक अध्यक्ष मा.संदिप बाबुराव दळवी यांचेकडून त्यांची आई कै.लक्ष्मी बाबुराव दळवी यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व गुरुपोर्णिमे निमित्त समाजाच काहीतरी देणं लागतो व समाजातील गरजु व निराधार लोकांना आपल्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी येवढी का थोडी मदत व्हावी व त्यांना थोडा हातभार लागावा या उद्देशातून व जाणिवेतून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.त्यांच्या या आदर्श निर्माण करणाऱ्यां सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे.या आधी ही अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत.

      यावेळेस वृध्दाश्रमास तेल-5kg,तांदूळ-10kg,गहु-10kg,साखर-5kg,ज्वारी-5kg,तूरडाळ-1kg,मुग-1kg,बिस्किट पुडे-20,गुळ-2kg,खोबरेल तेल- 1लिटर,बेसन-3kg,मीठ-5kg,फिनेल-5लि,हॅन्डवाॅश-5लिटरअसे साहित्य वाटप केले.तसेच तेथील वृध्दांना नाष्टा ही वाटप करण्यात आला व आपुलकीने सर्वांची विचारपूस केली .या उपक्रमास आनंदा खाडे(कुर)यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमास माजी उपसरपंच संतोष कांबळे,अविनाश कवडे,बाळासो आसबे, ओमकार पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *