थकीत घरपट्टी, पाणीपट्टी 50% सवलतीचा लाभ घ्या

0

आकुळे ग्रामविकास अधिकारी सुरेश माने

सरूड. (प्रतिनिधी)  शाहूवाडी तालुक्यातील आकुळे येथील ग्रामपंचायत खातेदारांनी निवासी मालमत्ता कराच्या थकबाकीदारांनी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज्य अभियाना अंतर्गत घरपट्टी पाणीपट्टी थकबाकीत 50 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामविकास अधिकारी सुरेश माने यांनी केले आहे 

      यावेळी माने म्हणाले. घरपट्टी पाणीपट्टीच्या कर भरल्यावर थकबाकीच्या रकमेवर 50% सवलत देण्यात येत आहे ही विशेष सवलत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज्य अभियानांतर्गत योजनेअंतर्गत राबवण्यात आली आहे ही सवलत योजना 31 डिसेंबर 2025 पर्यंत मर्यादित असल्याने खातेदारांनी या मोहिमेत सक्रिय भाग घ्यावा या योजनेमुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवून मूलभूत सुविधाच्या उभारणीस चालना मिळणार आहे.  

   खातेदारांनी विलंब न लावता तात्काळ ग्रामपंचायत मध्ये येऊन कर भरावा व सवलतीचा लाभ जास्तीत जास्त खातेदारांनी घ्यावा यासाठी गावातील सरपंच सरिता चव्हाण उपसरपंच अशोक कुंभार ग्रामपंचायत सदस्य अनिकेत पाटील, दिनकर सुतार, वसुधा पाटील, शुभांगी पाटील, आशा गायकवाड, ज्योती सुतार हे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत तरी सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी आव्हान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *