छ. राजाराम साखर कारखान्याचे निवृत्त कार्यकारी संचालक पी.जी.मेढे यांचे दुःखद निधन

0
WhatsApp Image 2025-12-13 at 12.01.16 PM

साखर उद्योगामध्ये मोठी न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली – महादेवराव महाडिक यांनी शोक व्यक्त केला.

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : येथील छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कार्यकारी संचालक व  कारखानदारीमधील एक अभ्यासू व्यक्तिमत्व पी.जी.मेढे यांचे दुःखद निधन झाले. रक्षा विसर्जन रविवार दि. 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता पंचगंगा स्मशान भूमी येथे होणार आहे.

      देशातील तसेच महाराष्ट्रातील साखर उदयोगाचा सखोल अभ्यास करणारे साखर उद्योगाचे मार्गदर्शक आसणारे पी.जी मेढे अचानक जाण्याने कारखानदारीवर शोककळा पसरली आहे. मेढे यांची सुरूवात कार्पोरेशनचे डिस्पॅच क्लर्क पासून झाली असली तरी जास्त काळ त्यांनी साखर कारखानदारीला दिली. भोगावती कारखान्याकडे सेक्रेटरी तसेच कार्यकारी संचालक म्हणून बराच काळ काम केले त्यानंतर कुंभी कासारी साखर कारखान्यात त्यांना कार्यकारी संचालक म्हणून सेवा बजावली त्याच दरम्यान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी त्यांना राजाराम कारखान्यामध्ये काम करणेची संधी दिली, त्यांनी छ. राजाराम कारखाना नांवारूपाला आणला कारखान्याचे गाळपक्षमतेमध्ये वाढ केली.

      त्यांना छ. राजाराम कारखान्यात काम करत असतांना वसंतदादा शुगर इंन्स्टिट्युट, पुणे यांचा बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टरचा आवार्ड ही त्यांना मिळाला. असा हा साखर कारखान्यातील भिष्माचार्य कारखानादारीतुन हरपला त्याच्या निधनाने साखर उद्योगामध्ये मोठी न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *