मिरजेत धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाचे उद्घाटन
मिरज (प्रतिनिधी)
येथील मोहन वनखंडे शिवसेना महानगरप्रमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना मुंबईचे निवडणूक समन्वयक वैभव वाघ यांच्याहस्ते उत्साहात झाले. कार्यक्रमास सांगली जिल्हा अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यासह सागर वनखंडे, रामचंद्र साळुंखे, अमोल वळसंग, युवक नेता युवराज यमगर, विनायक हजारे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या दैनंदिन नागरी समस्या रस्ता, पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य, समाजकल्याण तसेच महापालिकेच्या विविध शासकीय योजनांसंदर्भातील मार्गदर्शन-यासाठी हा सहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण हा या उपक्रमाच मुख्य हेतू आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाचा लाभ घ्यावा. आपल्या परिसरातीन कोणतीही नागरी तक्रार, प्रश्न किंव योजनांची माहिती मिळवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या प्रत्येक समस्येला तत्पर आणि जलद प्रतिसाद देण्याची हमी दिली जाईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.


