चित्रदुर्गात बसला आग: 17 हून अधिक जण जिवंत जळाले

0

एक भयानक शोकांतिका-मध्यरात्री कंटेनरच्या रूपात राक्षस बनला काळ
चिक्कोडी,(अजित सुतार)-
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे 2 वाजता एका खाजगी बसला लागलेल्या भिषण आगीमुळे बसमधील 17 जण जिवंत जळाले असल्याची भितीदायक घटना घडली आहे. तर या घटनेत तर 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. विरुद्ध दिशेने येणारा कंटेनर दुभाजकावरून उडून बसला धडकला. त्यामुळे डिझेल टाकीचा स्फोट होवून बसला आग लागल्याची माहिती सुत्राकडून समजते. ही बस बेंगलोरहुन गोकर्णकडे जात होती. तर कंटेनर हिरियुरहून बंगळुरूला जात होता.


सदर बस सी बर्ड कोच टुरिस्ट बस असून बस मध्ये 14 महिला व 15 पुरुष प्रवास करीत होते.जखमींना हिरियुरसह इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर बस चालक, कंडक्टर आणि प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या आणि ते वाचले. लॉरी चालक कुलदीप याचा मृत्यू झाल्याचे समजते.अपघातानंतर, राष्ट्रीय महामार्ग 48 वर सुमारे 30 किमी वाहतूक कोंडी झाली होती, शिरापर्यंत हजारो वाहने अनेक किलोमीटरपर्यंत उभी होती.
अपघातग्रस्त बस बेंगळुरूहून गोकर्णला जात होती अशी माहिती मिळाली आहे. एसपी रणजीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ही घटना हिरीयुर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. बसमध्ये चालक आणि वाहक असे एकूण 31 जण प्रवास करत होते.25 जण गोकर्णाचे, दोन कुमटा आणि दोन शिवमोगा येथील असल्याचे कळते.
बुकिंगच्या तपशीलांनुसार, मंजुनाथ, संध्या, शशांक, दिलीप, प्रीतीश्‍वरन, व्ही. बिंदू, के. कविता, अनिरुद्ध बॅनर्जी, अमृता, ईशा, सूरज, मनसा, मिलना, हेमराज कुमार, कल्पना प्रजापती, एम. शशिकांत, विजय भंडारी, नव्या, अभिषेक, एच. किरण पाल, एम. कीर्तन हे प्रवासी होते. मृत आणि जखमींची माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.
मोदींनी चित्रदुर्ग दुर्घटनेवर शोक
2 लाख रुपयांची भरपाई जाहीर
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे बस अपघातात 17 जण ठार झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.
या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याविषयी पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स अकाऊंटवर ही पोस्ट करीत ही घोषणा केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्याकडून 5 लाखाची मदत
चित्रदुर्ग बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना मुख्यमंत्री सिद्धरामय्याकडून 5 लाख रूपये तर जखमींना 50 हजार रुपये आर्थिक भरपाई जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *