दंड भरा अन्यथा… हेल्मेट खरेदी करा ः निपाणी पोलिसांचा उपक्रम

0

निपाणी.ता.25,(प्रतिनिधी)-
र् शहरासह परिसरात वारंवार घडत असलेल्या दुचाकी अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर निपाणी पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्तीची मोहीम तीव्र केली आहे.दरम्यान आज पोलीस प्रशासनाने विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर दिवसभर धडक कारवाई केली. तसेच दंंड भरावा किंवा जागेवरच नवीन हेल्मेटची खरेदी करावी असा नियम पोलीस प्रशासनाने लागू केला.त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे शहर परिसरातून कौतुक होत आहे.
अलीकडच्या काळामध्ये दुचाकी अपघातांच्या घटनेमध्ये वाढ होत आहेत.तसेच हेल्मेट नसल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे.पोलीस प्रशासनाने दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्तीचे केले असूनही दुचाकीस्वारांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.अनेक दुचाकीस्वार शहरातून अगदी सुसाटपणे विनाहेल्मेट प्रवास करत आहेत. त्यामुळे वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने आज छ.धर्मवीर संभाजीराजेे चौकात दुचाकीस्वारांना अडवून हेल्मेट सक्तीची मोहीम राबविली.विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना 500 रुपये दंडात्मक कारवाई केली.तसेच दंड भरणे जमत नसल्यास दुचाकीस्वारांना नवीन हेल्मेट खरेदीची मुभा देण्यात आली.यावेळी अनेक दुचाकी स्वारांनी दंड भरण्याऐवजी नवीन हेल्मेट खरेदी करणे पसंत केले.पोलीस प्रशासनाने थेट वेगा कंपनीकडून दुचाकीस्वारांना सवलतीच्या दरात हेल्मेट उपलब्ध करून दिल्यामुळे दुचाकी स्वारांनीही खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद दिला.याप्रसंगी सीपीआय बी.एस तळवार, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *