बेडकिहाळला पोल्ट्रीस आग लागून 1 कोटींवर नुकसान
30 हजार कोंबड्याची पिल्ली मृत्यूमुखी
बेडकिहाळ,ता.27(वार्ताहर)-
येथील गळतगा मार्गाच्या पश्चिमेस व्यंकटेश्वरा साखर कारखान्यापासून जवळच असलेल्या सर्व्हे क्रं.169 /13 मधील ताजुद्दीन सिकंदर मुल्ला, यांच्या पोल्ट्री फार्मला शुक्रवार रात्री 1215ः च्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून 15 दिवसाची 30 हजार लहान पिल्ले, औषध साहित्य, शेड, पिल्लांचे खाद्य , शेड भोवतालचे साहीत्य, शेडवरील पत्रे आगीत जळून खाक झाले.त्यामुळे मुल्ला यांना 1 कोटींवर अर्थिक फटका बसला आहे.
याविषयी समजलेली माहीती अशी की, नेहमीप्रमाणे शेडवर काम करत असलेले लोक जेवणासाठी गावांत आले होते. त्यांनतर शेडला शॉर्ट सर्किटने आग लागली.आगीची तीव्रता अधिकच वाढल्याने या आगीत 30 हजार कोंबड्यांची पिल्ली मरण पावली. तर शेडमधील औषध साहित्य, पिल्लांन साठी असलेले खाद्य व शेडचे इतर सर्व साहित्य, शेडवरील पत्रे असे मिळून सुमारे 1 कोटीच्यांवर साहित्य जळून खाक झाले.आग विझविण्यासाठी व्यंकटेश्वरा साखर कारखान्याचा अग्नीशामक बंबासह सदलगा येथील अग्नीशामकदलाच्या बंबाद्वारे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.या घटनेची माहिती समजताच चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ग्राम पंचायत सदस्य प्रमोदकुमार पाटील, यांच्यासह गावांतील मान्यवरांनी भेट दिली.शनिवारी सकाळी ग्रामतलाठी एस.एन नेम्मान्नावर, ग्राम पंचायत अध्यक्ष शिवानंद बीजले, यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला.यावेळी गळतगा येथील सरकारी पशु वैद्याधिकारी प्रशांत उदगट्टी, सदलगा पोलिस ठाण्याचेे जी.ए मुजावर, सहाय्यक पी.के.कुंभार, आर.आर तळवार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली.सदर व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी नागरीकातून होत आहे.


