वार्ड क्रमांक 29 निपाणीतील मालक चषक 2026 चा विजेता

0

निपाणी,-
गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या येथील रोहन साळवे फाउंंडेशनच्यावतीने म्युनिसीपल हायस्कूच्या पटागणांवर आयोजित मालक चषक 2026 या दिवसरात्र वार्डनिहित क्रिकेट स्पर्धेत हजारो क्रिकेट प्रेमीच्या उपस्थितीत झालेल्या अंतिम सामन्यात वार्ड प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांत 77 धावा जमविल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना वार्ड क्रमांक 30 संघाला केवळ 57 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे वार्ड क्रमांक 29 हा संघ निपाणीतील पहिल्या डेनाईट वार्डनिहित मालक चषक 2026 चा विजेता ठरला. विजेत्यांना चिकोडी जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, युवा नेते रोहण साळवे व मान्यवरांच्या हस्ते रोख 51 हजार व मालक चषक देवून गौरविण्यात आले.
तर उपविजेत्या वार्ड क, 30 संघाला 31 रूपये व चषक देवून गौरविण्यात आले. तर तृतीय आणि चतुर्थ संघाला रोख 11 हजार व चषक देण्यात आला. तर या स्पर्धेतील वैयक्तीक बक्षिसात सामनावीर बंंटी कांबळे (37 धावा व 2 बळी),उत्कृष्ट गोलंदाज सोनू उर्फ अनिकेत लोहार, उत्कृष्ट फलंदाज सद्दाम बडेघर (संपूर्ण स्पर्धेत 140 धावा), मालिकावीर अभिजीत सांडूगडे (9 बळी व 115 धावा) उदयोन्मुख खेळाडू शुभम अस्वले (वार्ड क्रमांक 3) यांना बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेचा 10 हजाराहून अधिक क्रिक्रेट प्रेमींनी आस्वाद घेतला. नेटके नियोजन आणि संपूर्ण शहरातील 31 वार्डाचा समावेश असल्याने स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. रविवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात वार्ड क्रमांक 19 व वार्ड क्रमांक 30 यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होवून वार्ड क्र. 30 संघाने अंतिम फेरीत धडक मारली.दुसऱ्या उपांत्य फेरीत वार्ड क्रमांक 23 व वार्ड क्रमांक 29 यांच्यात लढत होवून वार्ड क्रमांक 29 संघ अंंतिम फेरीत प्रवेश केला होता.
यावेळी बोलताना रोहन साळवे म्हणाले, निपाणीत उदोन्मुख खेळाडूंना संधी मिळावी.चांगल खेडाडू निर्माण होवून देशपातळीवर सहभाग होवून निपाणीचे नाव उजळावे, या उद्देशानेच या स्पर्धेचे आयोजन केले होते. येथून पुढेसुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरवून निपाणीतील खेळाडूंना देश पातळीपर्यंत खेळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सांगितले.
यावेळी सुजय पाटील, अशोककुमार असोदे, प्रतिक शाह, किरण पाटोळे, अस्लम शिकलगार, दिपक सावंत, अनिल भोसले, सुनिल हिरेगुडे, बबलू मांगोरे, चेतन पांगीरे, संतोष कांबळे, राजू नाईक, दिलीप घाटगे, संदिप माने आदीसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *