निपाणी ग्रामदैवत महालक्ष्मी वास्तूशांती, मुर्ती प्रतिष्ठापना अन्‌ त्रेवार्षिक यात्रा न भुतो न भविष्य अशी भव्य होणारःआम.शशिकला जोल्ले

0

सर्व शासकिय अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे, बैठकीत सुचना

निपाणी,(प्रतिनिधी)-
निपाणी शहराचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी माता देवालय प्रसाद वास्तू प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व भव्य त्रेवार्षिक यात्रा उत्सव हा 3 ते 11 फेब्रुवारीपासून सुरू आहेत. ग्रामदैवत असलेल्या महालक्ष्मी देवीचा उत्सव आणि न भुतो न भविष्य अशा मोठ्या थाटात होणार असल्याने यात्रा उत्सव कमिटीसह पोलीस, नगरपालिका, तहसिलदार, आरोग्य, अग्निशामक दलासह सर्व शासकिय यंत्रणा यात्रा काळाज सज्जतेने काम करणार आहे. कोणत्याही उणिवा न ठेवता 3 ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणारे उत्सव निपाणी शहर परिसरातील नागरीकांच्या सहभागाने होतील. यात्रा भव्य प्रमाणात होत असल्याने सर्व यंत्रणेने युध्दपातळीवर तयारी लागावे असा सल्ला आमदार शशिकला जोल्ले यांनी दिला.
शासकिय विश्रामधाम येथे शासकिय विभागाच्या अधिकारी व मंदिर उत्सव कमिटीच्या बैठकीत बोलताना आम.जोल्ले बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गेल्या तीन वर्षापासून यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. ग्रामदैवत महालक्ष्मीचे लहान मंदिर होते. त्यामुळे हे मंदिर भव्य करण्यासाठी आपण राजा शिवछत्रपती नाटकाचा प्रयोग करून आमदार फंडातून आणि जोल्ले ग्रुपकडून 90 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्वांच्या सहकार्याने भव्य मंदिर उभारले आहे. त्यामुळे यावर्षी मंदिर वास्तूशांती, मुर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि यात्रा उत्सव असा भव्य कार्यक्रम होणार असल्याने निपाणी स्थानीक पातळीवरील सर्व शासकिय अधिकाऱ्यांनी या यात्रेत सहभागी होवून यात्रेती गर्दी, वाहनतळ, लोकांना सुलभ दर्शन, सुरळीत विद्युत पुरवठा, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा आणि आरोग्याच्या बाबतीत चोख काम करणे गरजेचे आहे. स्थानिक शाळेतील एनसीसी, स्कॉऊट गाईड, सेवा दल, व्हाईट आर्मी आणि जादा पोलीस कुमक मागवून यात्रा काळात सर्व यंत्रणा काटेकोरपणे काम करणे गरजेचे आहे. यात्रा काळात सर्व अधिकारी निपाणीतच असायला हवेत. यात्रा काळात दोन दिवस शहरात कडक दारूबंदी होणार आहे. यात्रा काळात मंदिर परिसरात तात्पुरता सरकारी दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी मुलांना शाळेंना सुट्टी देण्यात येणार आहे. गांवातील भटकी कुत्री जनावरांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. तहसिलदार, सीपीआय आणि पालिका आयुक्त यांनी यात्रा काळात लागणाऱ्या सुविधाकडे लक्ष देण्यासाठी पुढाकार घेतील.शहरवासियांनी ग्रामदैवत महालक्ष्मी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी घरोघरी विद्युत रोषणाई, सजावट, रांगोळी काढून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करावा. सर्व होणाऱ्या धार्मिक विधीमध्ये सहभाग घ्यावा असेही आवाहन आम. जोल्ले यांनी केले.
आशिषभाई शाह म्हणाले, गेल्या तीन वर्षापासून भव्य प्रमाणात यात्रा साजरी करण्यात येत आहे. गेल्या पाच ते सात वर्षापासून मंदिराची भव्य उभारणी होत आहे. याकरीता आमदार शशिकला जोल्ले यांनी 90 लाखाचा निधी मिळवून दिला आहे. तर आम.प्रकाश हुक्केरी यांनी 10 लाखाचा निधी दिला आहे. धर्मस्थळ संस्थेकडून 3 लाखासह इतर देणगीदारांनी मोठे सहकार्य केले आहे. जागतिक किर्तीचे मुर्तीकार अरूण योगीराज यांनी नवीन आकर्षक मुर्ती बनविली आहे. 3 ते 11 काळात मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी केली जाणार आहे. 23 जानेवारी रोजी मुहूर्तमेड आणि ध्वजारोहण होणार आहे.3 फेब्रुवारी रोजी नूतन मुर्तीचे आगमन व गोमाता वत्सासह कलशासह सवाद्य मिरवूणक काढण्यात येणार आहे. 4 रोजी गणेश पुंजन, 5 रोजी वास्तुशांती अष्टकलश होम होणार आहे. 6 रोजी मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण जगदगुरू शकराचार्य यांच्या शुभहस्ते होणार आहे. 6 रोजी यात्रा असून ओटी भरणे नैवेद्य व आंंबिल होणार आहे. 7 रोजी ओटी भरणे 8 रोजी भव्य पालखी सोहळा होणार आहे.9 रोजी देवी याग होमहवन, 10 रोजी कुंकमार्चन व रात्री गोंधळ व 11 रोजी महाप्रसाद होणार आहे. शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले.
श्रीमंत दादाराजे देसाई-सरकार यांनी सर्व भाविकांचा सहभाग असणार असून शासकिय यंंत्रणाही सहभागी होत असल्याबद्दल आभार व्यक्त केले. तहसिलदार सुरेश मुंजे, आयुक्त गणपती पाटील, सीपीआय, बी एस तळवार, आरोग्य अधिकारी शिंदे, बीईओ महादेवी नाईक, सीडीपीओ सुप्रिया जडगे, हेस्कॉम सुरेश तहसिलदार यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी विविध सुविधा पुरविण्याबाबत आश्‍वासन देत कांहि सुचनाही व्यक्त केल्या.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयवंत भाटले, भाजपा शहराध्यक्ष राजु गुंदेशा, माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील, बंडा घोरपडे, योगीता घोरपडे, अभिजीत मुदकुडे, मुदकुडे, जुबेर बागवान, विजय टवळे, प्रशांत केस्ती, प्रणव मानवी ,शांतीनाथ मुदकुडे, नंंदू निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *