जम्मू,काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून ट्रॅव्हल एजंट असोसिएशन कोल्हापूरचे अभिनंदन
कोल्हापूरच्या ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे, उपाध्यक्ष विनोद कंबोज ,तसेच मेंबर ज्ञानेश्वर भस्मे यांचा समावेश होता.
कोल्हापूर, (प्रतिनिधी): पहेलगाम येथे पर्यटकावर झालेल्या हल्यानंतर काश्मीरमध्ये भारत सरकारच्या पर्यटन विभागाने व काश्मीर सरकारने देशातील टूर्स अँड ट्रॅव्हल असोसिएशनसला पर्यटक कश्मीरला पाठविण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार देशातील विशेषत: महाराष्टातील अनेक ट्रॅव्हल असोसिएशनच्यावतीने पर्यटक जम्मू काश्मीरला पाठवत असल्याबद्दल कृतज्ञता म्हणून काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मुंबईत एका छोटेखाणी कार्यक्रमात या सर्वांचे अभिनंदन केले. यामध्ये ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
गतवर्षी पहेलगाम काश्मीर येथे काही पर्यटकावर अंतकवादी हल्ला झाला होता त्यामध्ये अनेक पर्यटक मृत्यूमुखी पडले त्याबद्दल सर्व जगानी व भारताने आंतकवादाचा बहिष्कार केला होता तसेच काश्मीरच्या पर्यटनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यात कोणीही पर्यटक जायला इच्छुक नव्हते, परंतु पर्यटकावर झालेला हमला पर्यटन बंद करायचं हे आंतकवाद्याचं मिशन होतं त्यामुळे त्यांचं मिशन सक्सेस होईल असं काही करू नका म्हणून काही लोकांनी पर्यटकांना धीर दिला व देश पातळीवर सरकार पातळीवर तसेच काश्मीरच्या सरकार पातळीवर सुद्धा असे बरेचसे प्रयत्न झाले
भारत सरकारच्या पर्यटन विभागाने व काश्मीर सरकारने भारतातल्या काही टूर्स अँड ट्रॅव्हल असोसिएशनच्या अध्यक्षांची मीटिंग घेऊन त्यांना विनंती करून त्यांना पर्यटकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन त्यांना पर्यटक कश्मीरला पाठवा असे विनंती केली होती, त्यानुसार ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया (टाफि), ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र टूर ऑपरेटर असोसिएशन मुंबई, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे , ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक आणि ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांनी सातत्यपूर्वक पर्यटक जशी जम्मू काश्मीरला पाठवत राहिले. याबद्दल मुख्यमंत्री श्रीमान ओमर अब्दुल्ला या सर्वांचा सत्कार व अभिनंदन केले.
या कार्यक्रमास कोल्हापूरच्या ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे, उपाध्यक्ष विनोद कंबोज ,तसेच मेंबर ज्ञानेश्वर भस्मे यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला काश्मीर सरकार मधील पर्यटन मंत्री, पर्यटन सचिव, तसेच काश्मीर प्रांताचे खासदार ओबेराय (राज्यसभा) व बरेचसे पर्यटन क्षेत्रातील मातब्बर लोक तसेच राजाराणी ट्रॅव्हल्स चे व महाराष्ट्र टूर असोसिएशनचे अध्यक्ष विश्वजीत पाटील , अभिजीत पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेलं होतं.

00000


