महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात जान्हवी पाटीलची निवड

0
1000231592

क्रीडाशिक्षक पूजा ठाकूर, संदीप लंबे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात कमला कॉलेज, कोल्हापूरच्या कु.जान्हवी दीपक पाटील हिची निवड झाली आहे. कु.जान्हवी दीपक पाटील पुलाची शिरोली येथील असून कमला कॉलेजमध्ये ११ वी विज्ञान शाखेत शिकत आहे.

     तिला ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, सचिव प्राजक्त पाटील, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर आणि उपप्राचार्य एम. एन. जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच लेफ्टनंट ज्योती लेंगरे, क्रीडाशिक्षक पूजा ठाकूर, संदीप लंबे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *