रयतच्या शाहू कॉलेजमध्ये गुणवत्तावाढ मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
कर्मवीर भाऊराव पाटील प्रवेश परीक्षा अकॅडमी अंतर्गत वाणिज्य विषय शिक्षकांसाठी उपक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे, शाहू कॉलेज कदमवाडी कोल्हापूर येथे शुक्रवार (ता. २३) रोजी संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्रवेश परीक्षा अकॅडमी अंतर्गत ज्यु कॉलेज वाणिज्य विषयाच्या शिक्षकांसाठी एक दिवसीय गुणवत्तावाढ मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक, बौद्धिक तसेच स्पर्धा परीक्षा विषयक गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी संस्थेत कार्यरत शिक्षकांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे चेअरमन मा. डॉ. एम. बी. शेख, संस्थेचे सहसचिव मा. प्रिं. डॉ. राजेंद्र मोरे, सहा. विभागीय अधिकारी मा. यु. बी. वाळवेकर, डी. जी. कॉलेजचे उपप्राचार्य व वाणिज्य विभागप्रमुख श्री. एस. एम. मोटे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रा. डॉ. डी. आर. भोसले, संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डी. एम. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली.
ह्या कार्यशाळेला संबोधित करताना सहसचिव मा. प्रिं. डॉ. राजेंद्र मोरे शिक्षकांनी वाणिज्य विषयातील कौशल्य आत्मसाथ करावे. असे आवाहन केले. रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे चेअरमन मा. डॉ. एम. बी. शेख यांनी गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचे मत व्यक्त केले.
ह्या कार्यशाळेत वाणिज्य विषयातील महाविद्यालयांची गुणवत्ता वाढ, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीनुसार व क्षमतांनुसार लघुकालीन व दीर्घकालीन करिअर-ओरिएंटेड अभ्यासक्रम सुरू करणे. इ. विषयावर चर्चा झाली. उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना श्री. राहुल मुसळे (डी. जी. कॉलेज, सातारा), श्री. सागर मोहिते (सिद्धनाथ हाय. व ज्यु. कॉलेज खरसुंडी) व श्री. शंकर पवार (एस. जी. एम. कॉलेज, कराड) या तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी भाषा अध्यापन, स्पर्धा परीक्षांचे बदलते स्वरूप व विद्याथ्यांच्या कौशल्यविकासाबाबत सखोल मार्गदर्शन केले.
सकाळी १० पासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कार्यशाळेत मध्य व दक्षिण विभागांतील वाणिज्य विषयाच्या ४२ शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. ह्या कार्यशाळेचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या प्रा. एल. बी. चव्हाण यांनी केले तर आभार श्री. पी. बी. चव्हाण यांनी मानले. श्रीमती. जे. ए. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले


