आम.जोल्लेंच्या प्रयत्नाने शिरगुप्पी ओढा पुल संरक्षण कठड्यासाठी 45 लाखाचा निधी-भाजपा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम
नपाणी,ता.25(प्रतिनिधी)-
निपाणी मतदार संघाचा कायापालट करण्यात जोल्ले दांपत्य यशस्वी झाले आहे. निपाणी मतदार संघातील रस्ते, पाणी योजना, मंदिरे, शाळा, अंगणवाडी केंद्रे चांगल्या प्रकारची निर्माण झाली आहेत. बुदलमुखला जाणाऱ्या शिरगुप्पी रोडवरील ओढ्याच्या पुलाला संरक्षण कठडा निर्माण करण्यासाठी 45 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. हा सरंक्षण कठडा झाल्यानंतर या पुलावरील धोंकादायक वाहतूक सुरळीत झाल्यास बुदलमुख, पांगीरे, अर्जूनी गांवाला एसटी बसही लवकरच सुरू होईल असा विश्वास निपाणी ग्रामीण भाजपाध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी व्यक्त केला.
शिरगुप्पी ओढ्यावरील पुलाला भराव आणि संरक्षण कठडा निर्माण करण्यासाठी पंचायत राज्य खात्याकडून 45 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आमदार शशिकला जोल्ले व बीडीसी बॅकेंचे चेअरमन अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणी मतदार संघात प्रत्येक योजना यशस्वी राबविली आहे. त्यांच्याच फंडातून या पुलाच्या बाजूस संरक्षण कठडा आणि भराव घालून हा रस्ता चांगल्या प्रकारे वापरात येण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. हे काम पुर्णं झाल्यास या मार्गावरून बुदलमुख आणि पांगीरेसाठी एसटी सेवाही सुरू होणार आहे. त्यामुळे त्या भागातील नागरीकांना चांगला फायदा होणार असल्याचे सांगितले.
हालशुगरचे चेअरमन एम.पी. पाटील, संचालक प्रकाश शिंदे, रावसाहेब फराळे, सुहास गुगे, अविनाश पाटील, सिध्दू नराटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी ता.प. सदस्या मधूरा देसाई, सुरेशा कुंभार, संगीता कडाकणे, आनंदा कुंभार, शिवाजी चौगुले, पांडूरंग बरगे, बाळासाहेब देवडकर, पंकज देसाई, प्रकाश कुंभार, मल्लू नाईक, धर्मा कुंभार, गणू कडाकणे, काशीनाथ कडाकणे, नियाज मुल्ला, बाळू पाटील, शिवानंंद कुभार यांच्यासह शिरगुप्पी, बुदलमुख येंथील ग्रामस्थ उपस्थित होते.


