निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी निकू पाटील यांची फेरनिवड

0

निपाणी ता.4(प्रतिनिधी) निपाणी शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या टाऊन प्लॅनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी संयोजित उर्फ निकू पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा

वर्षाव होत आहे.निपाणी शहरात टाऊन प्लॅनिंगच्या माध्यमातून जमिनीचे नियोजन, सांडपाणी व्यवस्था, रस्ते व इतर पायाभूत सुविधा यांचा आराखडा तयार करणे तसेच इमारतींच्या बांधकामांना नियमांनुसार परवानगी देणे ही या विभागाची प्रमुख जबाबदारी आहे. वाढत्या शहरविस्तारामुळे या विभागाचे महत्त्व अधिक वाढले आहे.यापूर्वी पाटील यांची 15 मार्च 2024 रोजी टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी निवड झाली होती. या दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी शहरवासीयांना प्रामाणिकपणे सेवा देत प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या शिफारसीनुसार खासदार प्रियंका जारकीहोळी,यांच्यासह निपाणी भागातील काँग्रेस नेतेमंडळी व कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली फेरनिवड निवड झाली आहे. निवडीनंतर निकू पाटील यांनी शहर विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *