बोरगावला अमृत-2 योजनेचे काम पूर्ण करा ः नगरसेवकांची सभेत मागणी
बोरगाव,ता.28(प्रतिनिधी)-
बोरगाव शहरासाठी महत्त्वाकांक्षी पाणी योजना असलेल्या अमृत-2 योजनेमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. ठीक ठिकाणी खड्डे रस्ता उखडल्याने मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना त्रास होत आहे.काही ठिकाणी मुख्य लाईनचे कनेक्शनचे काम पूर्ण झाले आहे.काही ठिकाणी काम झालेले नाही, यासाठी अधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष घालून आगस्टपर्यंत लवकरात लवकर योजनेचे काम पूर्ण करून शहरवासीयांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्व नगरसेवकांनी आज केली.बोरगाव नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.मुख्याधिकारी एस. बी तोडकर सभे समोरील विषयाचे वाचन केले.
नगरसेवक अभयकुमार मगदूम म्हणाले, शहराच्या गटार पाणी संस्करण घटक निर्मितीसाठी 4 कोटी 84 लाख रुपयें खर्च होणार आहे. यामध्ये 1 कोटी 20 लाख नगरपंचायतीकडून मागणी करण्यात आले असून याबाबत नगरसेवकांना पहिल्यांदा कळविणे गरजेचे होते.मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे कोणतीच माहिती आम्हाला मिळालेली नाही.त्यामुळे याबाबत ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावे .तसेच अमृत तू योजनेमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. लवकरात लवकर अमृत योजना पूर्ण अशी सूचना केली.
नगरसेवक शरद जंगटे यांनी, उन्हाळ्यात इतकी पाणी समस्या होती पण म्हणावे तसे उपयोजना राबविले गेले नाही. गायरान व गावठाण मधील सर्वच मंदिरांचा सर्वे होणे गरजेचे आहे. गाळे भाडे वाढ अजूनही झालेली नाही, अमृत टू योजनेच्या कर्मचाऱ्याकडून नळ कनेक्शन देण्यासाठी शंभर रुपयाची आकारणी केली जात आहे. हे बेकायदेशीर असून याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी केली.नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी, मुख्यमंत्री नवरतन चार यामधून सफाई कर्मचाऱ्यांना दुचाकी देण्यात येणार आहे. तसेच शहराच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आले आहे. सर्वांचा विश्वास व सहकार्यामुळे शहराचा विकास होत आहे. डिसेंबर अखेर अमृत योजना पूर्ण होईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे नागरिकांनी सहकार्य करावे असे सांगितले.नगरसेविका शोभा हावले यांनीही विविध मते मांडली.
याप्रसंगी उपनगराध्यक्षा रुकसाना अपराज ,सभापती प्रदीप माळी, नगरसेवक अभयकुमार मगदूम, शरद जंगटे, शोभा हवले, माणिक कुंभार, पिंटू कांबळे,तुळशीदास वसवाडे,अश्विनी पवार, वर्षा मनगुत्ते, भारती वसवाडे, जावेद मकानदार, सुवर्णा सोबाने, रोहित पाटील, संगीता शिंगे, गिरिजा वठारे, यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.पोपट कुरळे यांनी आभार मानले.


