नगरपंचायतीच्या मासिक सभेत सत्ताधारी गटाचा मनमानी कारभार-जंगटे

0
IMG_20260728_124422391

बोरगाव,ता.28(प्रतिनिधी)-
मंगळवार दि.28 जुलै रोजी नगरपंचायतीची मासिक सभा होती. या सभेमध्ये शहराच्या विकासाबाबतचे आमचे काही विषय होते. या विषयांचे चर्चा करण्याबाबत 8 दिवस आधीच माहिती दिली होती. परंतु विषयाचे वाचन न करताच नगराध्यक्षांनी आपला विषय पुढील सभेत बघू असे बेजबाबदारपणे उत्तर दिल्याने सत्ताधारी गटाने मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप वार्ड क्रमांक 01 चे विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी केला.
याबाबत नगरपंचायतीच्या समोर बोलताना शरद जंगटे म्हणाले, आज बोरगाव नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेसमोरील सर्व विषयाचे वाचन झाल्यानंतर आपले काही विषय होते व या विषयाचे वाचन करणे गरजेचे होते. कारण आपण सभेपूर्वी आठ दिवस आधीच या विषयासंदर्भात नगरपंचायतीला निवेदन व मागणीचे पत्रही दिले होते. आज या विषयाचे वाचन करणे गरजेचे असताना नगराध्यक्ष कांबळे यांनी तुमचे विषय पुढील सभेत बघू असे सांगत सभेतून बाहेर पडले.साधे विषयाचे वाचन सुद्धा झाले नाही.शहराच्या विकासात भर पडावे म्हणून आपण प्रयत्न करीत असताना आपल्याला डावलण्यात येत आहे.
शहरात जैन समाज सर्वाधिक असून त्या ठिकाणी गोशाळा निर्मितीसाठी पाच एकर जमीन मंजूर व्हावे, मिनी टेक्स्टाईल पार्क व जोल्ले टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी रस्ते व गटारी व्हावेत, शहरात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस चौकी उभारावी, कुंभार तळ्यातील गाळ काढून सुशोभीकरण करावे, श्रीस्वामी समर्थ व बाळूमामा मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणेबाबत, तसेच बेडकीहाळ रस्ता लगत बोरगाव सर्कल पासून ते आयबीपर्यंत दुकान गाळे निर्मिती व्हावेत अशी आपली मागणी होती.आपण दि.23 जुलै 2026 रोजीच या बाबत मुख्याधिकारी यांना अधिकृत निवेदन दिले होते. व या पत्राचे वाचन मासिक सभेत व्हावे अशी मागणी होती परंतु आज मासिक सभेत याबाबत कोणतेच वाचन झाले नाही ,आपण याबाबत विचारले असता उत्तर देण्यास नगराध्यक्षांनी टाळाटाळ केले. आपण याबाबत जिल्हाधिकारी यांना लवकरात निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणार आहे.आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून शहराचा विकास होत आहे आणखीन विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू असे सांगण्यात येते .पण या ठिकाणी कोणतेच कार्य होत नाही त्यामुळे बोरगाव शहरातील सूज्ञ नागरिकांनी याचा विचार करावा अशीही मागणी यावेळी शरद जंगटे यांनी केली.याबाबत नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांना विचार
ले असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *