डॉ.प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंकलीत राष्ट्रस्तरीय कुस्ती स्पर्धा

0
IMG20260728150609

चिक्कोडी,ता.28(प्रतिनिधी)-
शिक्षण, आरोग्य, सहकार, राजकारण आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आशिया खंडात वेगळी ओळख निर्माण करणारे राज्यसभेचे माजी सदस्य व केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ.प्रभाकर कोरे यांचा 79 वा वाढदिवस शनिवार ता.1 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.सकाळी 11 वा.डॉ.कोरे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार होणार असून शिवालय परिसरात वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर, दुपारी 2 वा.अंकली (ता. चिकोडी) येथील केएलई संस्थेच्या श्रीमती शारदादेवी कोरे महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर राष्ट्रस्तरीय पुरुष जंगी निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा तसेच देशातील विविध राज्यांतील सुमारे 150 नामांकित कुस्तीपटू सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
पद्मश्री डॉ.प्रभाकर कोरे वाढदिवस समिती, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना, शिवशक्ती शुगर्स लिमिटेड, सौंदत्ती हर्म्स डिस्टिलरी प्रा. लि., यड्राव तसेच चिकोडी, अथणी, निपाणी आणि अंकली येथील केएलई संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.अंकली येथील शिवालयात झालेल्या बैठकीत कर्नाटक रत्न, कर्नाटक केसरी विजेते पैलवान रतनकुमार मठपती, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, वाढदिवस समितीचे स्वागताध्यक्ष भरतेश बनवणे आणि समितीचे अध्यक्ष व केएलई संस्थेचे संचालक बसवराज पाटील यांनी माहिती दिली.
यंदा एकूण 34 कुस्त्या होणार असून देशभरातील नामांकित मल्लांचा सहभाग राहणार आहे.प्रथम क्रमांकाची कुस्ती भारतातील सर्वश्रेष्ठ पैलवान पंजाबचा शेरा उर्फ सुमित गुजर विरुद्ध हिंदकेसरी व भारत केसरी विजेता भारतीय नौदलातील अधिकारी पैलवान पुष्पेद्र मलिक यांच्यात होणार असून द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी विजेता पै.असलम काझी यांचा पट्टा सिकंदर शेख विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदक विजेता महाराष्ट्र केसरी भारतीय सेना दलातील अधिकारी पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्यात होणार असून तृतीय क्रमांकाची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी वस्ताद काका पवार यांचा पट्टा पैलवान हर्षवर्धन सदगीर विरुद्ध भारत केसरी लीलु आखाडा हरियाणा पैलवान उमेश मथुरा चतुर्थ क्रमांक कुस्ती गंगावेश तालीम कोल्हापूर उपमहाराष्ट्र केसरी विजेता पै. प्रकाश बनकर विरुद्ध पंजाबचा सुभाष मलिक अकॅडमी चा पैलवान वंश बेनीवाल पाचव्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरच्या शहापुरी तालीमचा पैलवान नागराज बसढोणी विरुद्ध हरियाणाचा राष्ट्रीय पदक विजेता पै लक्ष्यकुमार कादियाना, सहाव्या क्रमांकाची कुस्ती उपकर्नाटक केसरी पै शिवानंद दड्डी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै सुनीलकुमार कोटगोड सातव्या क्रमांकाची कुस्ती खेलो इंडिया सुवर्णपदक विजेता पै शिवय्या पुजारी विरुद्ध पटियाला पंजाब पै सिद्धार्थ ढाखा तर आठव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पै कामेश पाटील विरुद्ध राष्ट्रीय कुस्तीपटू पै बसवराज हुलदी यांच्यात होणार आहे.
स्पर्धेसाठी हरियाणाचे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पैलवान रामफल मान, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते व चार वेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारे पैलवान योगेश्‍वर दत्त, हरियाणाचे पैलवान लीलू गुरुजी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच डबल कर्नाटक केसरी कल्लाप्पाण्णा शिरोळ, तेरदाळचे रमेश मुखरी, हळीइगळीचे श्रीमंत काणगोंडा आणि गंगावेश तालीम, कोल्हापूरचे वस्ताद विश्‍वास हरगुडले यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक चेतन पाटील, महावीर कात्रळे, महावीर मिरजे, भरतेश बनवणे, अजित देसाई, परसगौडा पाटील, संदीप पाटील, मल्लाप्पा म्हैशाळे, भीमगौडा पाटील,अण्णासाहेब इंगळे,नंदकुमार नाशीपुडी, शेखर पाटील, युवराज पाटील, आर.पी. खांडगावे, शिवप्रसाद कोरे, देवेंद्र कोरोशी, महांतेश पाटील, राहुल इचलकरंजे यांच्यासह, समितीचे सदस्य, चिदानंद कोरे व शिवशक्ती शुगर्सचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *