व्यसनमुक्त युवकच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू शकतात

0
WhatsApp Image 2026-09-25 at 2.05.47 PM

: डॉ. पी. डी. परीट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येत्या काळात भारताला महासत्ता बनविण्यासाठी युवकांचे योगदान फार मोठे असणार आहे. त्यासाठी भारतीय युवकाने सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहायला हवे. युवक हेच देशाचे भविष्य असून, व्यसनमुक्त युवकच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू शकतात असे मत डॉ.  पुरुषोत्तम परीट यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथील राजर्षी छ. शाहू कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त ‘विकसित भारत संकल्प अभियानासाठी नशायुक्त युवा’ ह्या विशेष व्याख्यानात बोलत होते.

      आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाची  भूमिका आहे. महाविद्यालयीन जीवनात रा. से. योजनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. विद्यार्थ्यांनी सर्वप्रकारच्या  नशेपासून दूर राहावे आणि आपल्या परिसरालाही व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. डी. आर. भोसले यांनी केले.

      कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. जी. एम. लवंगारे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी एन. एस. एस. च्या स्थापनेचा उद्देश सांगून आजच्या तरुण पिढीला देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी उद्युक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. आर. माजगावकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. एस. पी. मुलाणी यांनी केले. या कार्यक्रमास ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या,  प्रा. एल. बी. चव्हाण, महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *