स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीस उपयुक्त

0
१

  डॉ. पुरुषोत्तम परीट

कोल्हापूर ता. 26 (प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद यांनी राजयोगाच्या माध्यमातून विश्वबंधुता सांगण्याचा प्रयत्न केला. आजचे जग भौतिक सुखांकडे धावत असताना तरुणांमध्ये मानसिक ताणतणाव वाढत आहे. अशा काळात स्वामी विवेकानंदांचा आत्मविश्वास, एकाग्रता आणि चारित्र्य निर्मितीचा विचारच तरुणांना योग्य दिशा दाखवू शकतो. असे मत डॉ. पुरुषोत्तम परीट यांनी व्यक्त केले. ते  कोल्हापूर येथील राजर्षी छ. शाहू कॉलेजच्या मराठी विभागाने विश्व बंधुता दिवस पंधरवडानिमित्त आयोजित केलेल्या  व्याख्यानात ते बोलत होते.

महाराष्ट्रात निर्माण झालेले संत साहित्य हे  विश्वबंधुत्वाची संकल्पना अधिक विकसित करणारे होते.  अवघे विश्वची माझे घर ही ज्ञानेश्वरांची भूमिका व्यापक अर्थाने आपल्या सर्वांनाच विश्वबंधुतेकडे घेवून जाणारी आहे. असे मत  कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले यांनी व्यक्त केले. यावेळी संपन्न झालेल्या भाषण स्पर्धेत सत्तावीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.  रिद्धी कमते, मान्या पांडे, वैभवी लांबोरे यांनी अनुक्रमे मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतून प्रथम क्रमांक पटकावला.

या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. एम. ए. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बी. एम. मगदूम यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार डॉ. एस. पी. मुलाणी यांनी मानले. या कार्यक्रमास ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या,  प्रा. एल. बी. चव्हाण, महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *