समताधिष्ठित समाजनिर्मिती हेच कर्मवीरांच्या जीवनाचे ध्येय

0
1

– प्राचार्य, डॉ. शिवलिंग मेनकुदळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन आणि कार्य याचा  बारकाईने विचार केला तर त्यातून समताधिष्ठित समाजनिर्मिती ही गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. इतर जातीच्या लोकांना विहिरीवरील पाणी भरू दिले जात नसल्याचे पाहून त्या विहिरीचे पाणी शेदण्याचे चाक मोडणे, ईश्वरपूर येथील वर्गाबाहेर उभा केलेल्या विद्यार्थ्याची बाजू घेवून शिक्षकाशी भांडणे अथवा कुपर यांनी आपल्या नफ्यातील रक्कम कामगाराच्या मुलांच्या  शिक्षणासाठी खर्च करावी. यासाठी आण्णा यांनी धरलेला आग्रह.  या साऱ्या घटना कर्मवीर आण्णा याची समताधिष्ठित दृष्टी अधोरेखित करतात. म्हणूनच  समताधिष्ठित समाजनिर्मिती हेच कर्मवीरांच्या जीवनाचे ध्येय  होते. असे मत रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य, डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले.

            रयत शिक्षण संस्थेचे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या  विशेष व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. मेनकुदळे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे योगदान मोठे असल्याचे सांगितले.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. डी. डी. कुरळपकर हे होते. 

          काही मानवाचे विचार समाजापुढे पुन्हा पुन्हा मांडावे लागतात.  कर्मवीरांनी गोर गरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाचा प्रकार न्येला. जर आण्णा आणि त्यांची रयत शिक्षण संस्था नसती तर आजचा महाराष्ट्र उभा राहू शकला नसता. विद्यार्थी म्हणून आपण सर्वांनी आण्णांच्या आयुष्यातील आवश्यक तो भाग घेवून वाटचाल करा. असे आवाहन कार्यक्रमाचे  अध्यक्ष डॉ. कुरळपकर  यांनी  केले.

       याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा चढता आलेख विशद केला. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग  कौन्सिल सदस्य, श्री. अजित भिकूगौंडा पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कर्मवीर सप्ताहानिमित्त संपन्न झालेल्या  मेहंदी, रांगोळी, निबंध, पाककला, स्थळ छायाचित्रण, पुष्परचना, वक्तृत्त्व, चित्रकला या स्पर्धा, विद्यापीठ आणि बोर्ड परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी, विविध विषयात सर्वप्रथम आलेले विद्यार्थी व क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी  बजावणारा प्रवीण बबन कांबळे या  विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

       या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्या, मा. सरोज पाटील (माई), महाविद्यालय विकास समितीचे व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. विक्रांत पाटील,  मा. सौ. दिपाली तायवडे पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले , रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रा. डी. एम. गायकवाड, आयक्युएससी प्रमुख डॉ. यु. बी. शेळके, उपप्राचार्या,प्रो. डॉ. पी. बी. पिस्टे, प्रो. डॉ. एम. बी. देसाई, ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण,  कार्यालयीन अधीक्षक श्री. बी. एम. शिंदे व  सर्व विभागाचे विभागप्रमुख, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचे स्वागत प्रा. डी. ए. माळवेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. एस. आर. माजगावकर यांनी व आभारप्रदर्शन डॉ. ए. एस.शेख यांनी केले

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *