शाहू कॉलेजच्यावतीने हेल्थ वॉकचे आयोजन
कोल्हापूर :येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्रादेशिक संचनालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुणे आणि शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत गुरुवार दि. ०१ ऑक्टोबर रोजी हेल्थ वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणातील कर्मवीर भाऊराव पाटील आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास मा. प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. एम. लवंगारे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विक्रमसिंह नागरे – पाटील, कला विभागाच्या उपप्राचार्या, डॉ. एस. पी. खोले, ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण, यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून हेल्थ वॉकला प्रारंभ झाला. प्रारंभी सर्वांना व्यसन मुक्ततेविषयीचे शपथ देण्यात आली.
महाविद्यालय ते कदमवाडी असे ह्या वॉकचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. नशामुक्त भारताचा संदेश देणारे विविध फलक हे ह्या वॉकचे मुख्य आकर्षण होते.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या ह्या वॉकचे मध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी कला विभागाच्या उपप्राचार्या, डॉ. एस. पी. खोले, ज्युनिअर विभागाच्या उपप्राचार्या, प्रा. एल. बी. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व सदस्य, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


