शाहू कॉलेजमध्ये ए. आय. च्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वाटप
कोल्हापूर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता, मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कोडिंग, रोबोटिक्स, थ्री डी प्रिंटिंग हा नविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला अशा विद्यार्थांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रि.डॉ.शिवलिंग मेंनकुदळे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या 15 व कर्नाटक राज्यातील 01 अशा 16 जिल्ह्यामध्ये विस्तारलेली असून संस्थेने सर्वसामान्य समाजातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काळानुरुप आधुनिक शिक्षण देण्याचे कार्य केले आहे. संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार रयत शिक्षण संस्थेच्या सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात विविध क्षेत्रामध्ये रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी व रयतच्या विद्यार्थ्यांना अद्यावत तांत्रिक शिक्षण अवगत होण्यासाठी इ.5 वी पासून ते पदवीपर्यंतच्या सर्व शाखांमध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता, मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कोडिंग, रोबोटिक्स, थ्री डी प्रिंटिंग हा नविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु केला आहे.सदर ए.आय.कोर्सचे समन्वयक म्हणून प्रा.ए.टी.पाटील व प्रा.झेबा शेख यांनी काम पाहिले.
रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य श्री.अजित पाटील,डॉ. डी. डी. कुरळपकर, प्राचार्य प्रो.डॉ.डी.आर.भोसले, वरिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. पी. पी.पिष्टे,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.एल.बी.चव्हाण, सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.


