आत्मस्वरूप प्रमोद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

0
WhatsApp Image 2026-10-09 at 2.23.13 PM

आत्मस्वरूप प्रमोद महाराज दत्त चॅरिटेबल ट्रस्टचा सामाजिक उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आत्मस्वरूप प्रमोद महाराज दत्त चॅरिटेबल ट्रस्ट, बोंद्रे नगर, पाडळी रोड, मथुरा नगरी, ता. करवीर यांच्या वतीने प. पू. आत्मस्वरूप प्रमोद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श विद्यामंदिर, नागदेववाडी येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. गुरुवारी आयोजित या कार्यक्रमाला महाराजांचे चिरंजीव प्रसाद आणि पराग उपस्थित होते.

          आत्मस्वरूप प्रमोद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त ट्रस्टच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली. या वेळी आत्मस्वरूप प्रमोद महाराज संप्रदायाचे अनुयायी मारुती पवार , सुनील पिंपळे, सुरेश गावडे, प्रवीण ठाणेकर, अनिल पिंपळे, संगीता ताई, आणि मोहन सुतार उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एम. चरापले, वाय. जी. मोहिते  आणि ए. पी. नाळे सर यांचीही उपस्थिती होती.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *