वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात उत्तम संधी : सौ. मानसी शिंदे
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स
कोल्हापूर (प्रतिनिधी) दिवसेंदिवस बँकिंग क्षेत्राचे जाळे विस्तारत असून बँकांच्या शाखा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात उत्तम संधी आहे असे प्रतिपादन राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखाधिकारी मानसी शिंदे यांनी केले. त्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मधील अर्थशास्त्र विभाग आणि बँकिंग सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत बँक स्टडी व्हिजिट प्रसंगी बोलत होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांची होती.
सौ. शिंदे पुढे म्हणाल्या ,की देशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बँकेची गरज आहे डिजिटल बँकिंग, यूपीआय, आरटीजीएस,एनईएफटी, कॅशलेस व्यवहार, मोबाईल बँकिंग यामुळे बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना चांगले भवितव्य आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी बँकेचे कामकाज प्रत्यक्ष कसे चालते त्याचा अनुभव घेतला उपप्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांनी महाविद्यालयाला बँक स्टडी व्हिजिट ची परवानगी दिल्याबद्दल बँकेच्या व्यवस्थापनाचे आभार मानले. या कार्यक्रमाला कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ .प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड वैभव पेडणेकर, ॲड अमित बाडकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी डॉ.एस. एफ. बोथीकर, प्रा. कुबेर दिंडे, डॉ.वैशाली जगताप, प्रा. संग्राम पाटील आणि 60 विद्यार्थी उपस्थित होते.


