नवोपक्रमशील शिक्षक संतोष यादव यांच्या नाविण्यपुर्ण नवोपक्रमास पारितोषिक

सांगली (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी, प्रशासन अधिकारी रामचंद्र टोणे यांच्या हस्ते नवोपक्रमशील शिक्षक संतोष यादव यांच्या नाविण्यपुर्ण नवोपक्रमास पारितोषिक देत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (विद्या परिषद पुणे) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धा २४-२५ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आले. यामध्ये मनपा शाळा क्र. १ मधील सहा. शिक्षक संतोष यादव यांना मनपा शिक्षण विभाग सांगलीच्या ” जाऊ तिथे वाचू…” या नाविण्यपुर्ण नवोपक्रमास जिल्हा स्तरीय स्पर्धेत पाचवा क्रमांक प्राप्त झाला.
संतोष यादव यांनी स्क्रोलिंग लाईट पासून एक नवीन नवोपक्रम सादर केला आहे. सन २०२१ पासून आठवडी बाजार, परसबाग, पुस्तकांची गुढी, कोरोनाची होळी, जाऊ तिथे वाचू, MY NAME ON MY HAND, ज्ञानाचा दीपोत्सव, माझे शरीर – माझा योग, माझी शाळा माझा विठ्ठल, माझे शिक्षक माझे गुरू, सर्पमित्र, नागपंचमी, ज्ञानाची हंडी, माझी राखी माझ्या सैनिकासाठी, रक्षाबंधन-वृक्षाबंधन, माझी शाळा-माझा बाप्पा, शब्दांचा खजिना, महिला सक्षमीकरण- माझा एक दिवस सुट्टीचा, माझा हादगा, जागर स्त्रीशक्तीचा, माझा दांडिया, आम्ही सावित्रीच्या लेकी असे विविध 60 पेक्षा विविध नावीन्यपूर्ण उपक्रम म. न. पा. शाळा क्र. 1 येथे यादव यांनी राबविले आहेत.
या यशाबद्दल आयुक्त शुभम गुप्ता, उपयुक्त वैभव साबळे, प्रशासन अधिकारी रामचंद्र टोणे, माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे साहेब यांनी विशेष अभिनंदन व मार्गदर्शन केले आहे. या नवोपक्रमास प्रा. डाॅ.रमेश होसकोटी, डाॅ.पल्लवी चिंचोळकर, अरुण पाटील, नवोपक्रम विभाग प्रमुख विजय गदगडे, डाॅ.वैशाली भोई, निता कांबळे, आश्विनी पाटील, मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी (प्राथ.), साहेबराव लोंढे शिक्षणाधिकारी (माध्य.), महेश धोत्रे शिक्षणाधिकारी (योजना), केंद्र क्र. ७ मिरजचे केंद्र समन्वयक राहुल होनमोरे, म.न.पा. शाळा क्र. 1 मिरजच्या मुख्याध्यापिका सौ. सविता पवार, श्रीमती सुलभा ढमाले, श्रीमती निर्मला माळी, सौ. महानंदा राजमाने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.