कोल्हापूरात थंडीची चाहूल
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात थंडीची चाहूल लागली असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरातील हवामानातील बदल झाला असून तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. गेल्या 2-4 दिवसापासून सकाळी व सायंकाळी गारठा जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वेटर्स, कानटोप्या, हॅन्डग्लोज,जर्कीन वापरण्यास सुरवात झाली आहे.
गेल्या आठवडयामध्ये पाऊस आणि कडक उन्हाळ असा हगाम होतो, मात्र हवामानात अचानगपणे बदल होऊन सद्या थंडीचा हगाम सुरु झाला आहे. जोराची थंडी असल्यामुळे जेष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडणे सोयीचे बनले आहे. यापुढेही तापमानात आणखी ३ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हवामान कोरडे आणि थंड राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.
शहरात थंडी सुरू झाली आहे आणि तापमान कमी झाले आहे, ज्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी गारवा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात किमान तापमानात मोठी घट झाली असून, काही ठिकाणी ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पावसाळा संपल्यामुळे वातावरण थंड आणि कोरडे होऊ लागले आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी गारवा जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी आणि संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवत आहे. किमान तापमानात घट झाली आहे, ज्यामुळे थंडीचा अनुभव येत आहे. कोल्हापूरमध्ये साधारणपणे ऑक्टोबरपासून सर्वसाधारणपणे थंडीचा काळ असतो, ज्यामध्ये सरासरी दैनिक तापमान कमी असते.
उत्तर भारतातील थंडीचे वारे महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत, त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील अनेक भागांत थंडीची चाहूल लागली आहे. पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे कोरडे आणि थंड वारे मध्य भारतात वाहत आहेत, ज्याचा परिणाम कोल्हापूरसह इतर भागांवर होत आहे. नागरिकांनी सकाळी आणि रात्री उबदार कपड्यांचा वापर करावा. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी थंडीपासून विशेष काळजी घ्यावी. हवामानातील बदल लक्षात घेऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसांत ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
थंडी वाढल्यामुळे लहानमुले व जेष्ठासाठी ऊलनचे स्वेटर, कानटोपी, जॅकेट, उबदार शाल यांच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे विक्रेता विठ्ठल शेकाप यांनी सांगीतले, लहान मुलांसाठी 200 रुपयांपासून पुढे ऊबदार कपडे मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. मोठ्यांसाठी 300 पासून पुढे 1000 किंमती पर्यंत स्वेटर बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. काही दुकानदारांनी ऊलन कपड्यावरती विन्टर ऑफरही चालू केला आहे. एकूणच थंडीपासून संरक्षण करणे क्रमप्राप्त आहे.
00000


