मराठा समाजाचे नेते आम.संतोष लाड यांना मंत्रिमंडळात मोठे पद द्यावे=चिक्कोडीतील मराठा समाजबांधवाची बैठकीत मागणीे

0
IMG-20260602-WA0175

चिक्कोडी,ता.02(प्रतिनिधी)-
कर्नाटकामध्ये बुधवारी होत असलेल्या नव्या मंत्रिमंडळ रचनेत कर्नाटक राज्यातील मराठा समाजाचे नेते व कलघटगीचे आमदार व विद्यमान कामगार खात्याचे मंत्री संतोष लाड यांना मोठे पद द्यावे अशी मागणी चिकोडी तालुका मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.आज सायंकाळी शहरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.
यावेळी मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष ॲड.बी.आर यादव म्हणाले कर्नाटका राज्यामध्ये 60 ते 70 लाख मराठा समाज बांधव आहेत. समाजाचे नेते संतोष लाड यांनी नेहमी राज्यातील ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी व मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यतत्पर आहेत. लाड यांचे राज्यासाठी मोठे योगदान आहे अशा मराठा समाजाच्या नेत्याला मंत्रिमंडळात उच्च दर्जाचे स्थान राष्ट्रीय काँग्रेस समितीने व कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने, हंगामी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, भावी मुख्यमंत्री डि के शिवकुमार यांनी देऊन मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी समाजाच्या वतीने करत असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे राज्यातील ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांचे चिकोडी तालुक्याच्या व मराठा समाजाच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे हायकमांडने हुकेरी पिता- पुत्रांपैकी एकास मंत्री पद द्यावे. यामुळे या भागाच्या विकासासह समाजाच्या विकासाला चालना मिळेल असे समाजाच्या वतीने मागणी करत असल्याचे सांगितले.
यावेळी चिकोडी तालुका मराठा समाजाचे गौरवअध्यक्ष रामा माने यांनी लाड यांच्यासह काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असलेले ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी किंवा त्यांचे सुपुत्र आमदार गणेश हुक्केरी यांच्यापैकी एकाच मंत्रीपद द्यावे.अशी मागणी केली.
यावेळी तालुका उपाध्यक्ष अनिल माने, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, ज्योतिबा खामकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा